सविंदणे -शिरूर शहर परिसरात गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपीस पिस्तूल, जिवंत काडतुसासह जेरबंद
करण्यात आले. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी ग्रामीण जिल्ह्यात तसेच पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात बेकायदा बिगर परवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाईचे आदेश दिले आहे. स्वप्नील शंकर कुरळे हा बाबुरावनगर येथील त्याच्या कार्यालयात विनापरवाना गावठी पिस्तूल जवळ बाळगून बसलेला आहे. अशी माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी तात्काळ पोलीस पथक तयार करून आरोपीस पिस्तूलासह ताब्यात घेण्याबाबत पोलीस पथकास सूचना दिल्या.
पथकाने स्वप्नील शंकर कुरळे याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातून 1 लाख 30 हजार रुपयाच्या किंमतीचे एक गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतूस असा एकूण 3 लाख 1 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपीस देखील अटक करण्यात आलेली आहे. त्याने ते पिस्तूल अरबाज रहिम शेख (रा. शिरूर) याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश मिट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, एकनाथ पाटील, हवालदार सुद्रिक आदींनी केली. पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करीत आहेत.