वाघोली -केसनंद येथील श्री जोगेश्वरी विद्यालयातील दहावीच्या परीक्षेत प्रविष्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केसनंद ग्रामपंचायत सदस्य प्रमोद हरगुडे यांनी मोफत रिक्षा उपलब्ध करून दिली आहे. शालेय विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळेवर ये-जा करता यावे, यासाठी हा उपक्रम राबवला असून या उपक्रमाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.
प्रमोद हरगुडे म्हणाले, वाड्या वस्त्यावरील मुला-मुलींना दहावीच्या परीक्षेच्या कालावधीत ये जा करताना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये व त्यांना परीक्षा वेळेत देता यावी यासाठी मोफत रिक्षा उपलब्ध करून दिली आहे.
या उपक्रमाचे केसनंद ग्रामपंचायत माजी सरपंच मिलिंद हरगुडे, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र सावंत, माजी सरपंच तानाजी हरगुडे, कुबेर सृष्टी पार्कचे संस्थापक अध्यक्ष रमेश हरगुडे पाटील, सरपंच दत्तात्रय हरगुडे यांनी अभिनंदन केले आहे.