पुणे – राज्याअंतर्गत तसेच परराज्यात जाणाºया नागरिकांना प्रवास करण्यासाठी शासनाने प्रवासी परवाना (ई-पास) बाळगण्याची अट घातली आहे. परवाना मिळवल्यानंतर प्रवासास मुभा देण्यात येत असून मंगळवारपर्यंत प्रवासी परवाना मिळवण्यासाठी पुणे पोलिसांकडे एक लाख ११ हजार २४३ अर्ज सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी २८ हजार ६९८ नागरिकांना प्रवासी परवाने मंजूर करण्यात आले आहेत.
प्रवासी परवाना मिळवण्यसाठी संकेतस्थळावर विनंती अर्ज सादर करावयाचा आहे. २३ एप्रिलपासून प्रवासी परवाने देण्यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू, अंत्यविधी, वैद्याकीय कारण तसेच विवाह समारंभासाठी वधू-वर त्यांचे आई-वडिल, भाऊ, बहिण, काका, आत्या, मावशी अशांना प्रवासी परवाना देण्यात येणार आहे. त्यासाठी निमंत्रण पत्रिका जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. विमान प्रवास करणाºया नागरिकांना परवाने देण्यात येणार आहेत. प्रवासी परवान्यासाठी अर्ज करताना नागरिकांकडून अनेक त्रुटी ठेवल्या जात आहेत.
“काही नागरिकांचे परवाने प्रलंबित आहे किंवा नाकारले गेले आहेत. त्यांना काही शंका असल्यास त्यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या ट्विटर खात्यावर संपर्क साधावा. काही शंका असल्यास ट्विटखाली प्रवासी परवान्यासाठी अर्ज केल्याचा टोकन क्रमांका टाकावा. त्यानंतर पोलिसांकडून पुन्हा परवान्यासाठी लागणाºया कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल,” असे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.