पुणे : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कोरेगाव पार्क येथील हाॅटेल तसेच दुकान व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणांवर शनिवारी कारवाई करण्यात आली. यावेळी गल्ली क्रमांक ६ व ७ मधील व्यावसायिकांनी केलेले फ्रंट मार्जिन, साइड मार्जीन मधील अनधिकृत स्टॉल, पक्के शेड अश्या स्वरूपाचे बांधकाम या कारवाईत काढण्यात आले असल्याची महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
घोले रोड क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत अतिक्रमण, आकाश चिन्ह विभाग व बांधकाम विकास विभाग झोन ४ यांची संयुक्तपणे करण्यात आली आहे. त्यासाठी २ जेसीबी, ३ अतिक्रमन वाहने, पोलीस तसेच महाराष्ट्र सुरक्ष मंडळाच्या सुरक्षा रक्षकांचा समावेश होता.