पुणे -प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून पक्क्या लायसन्स चाचण्यांसाठी आयडीटीआर आणि आळंदी रस्ता येथे चाचणी घेतली जाते. मात्र, आळंदी रस्ता चाचणी मैदान येथे ब्रेक टेस्ट ट्रॅक प्रकल्पाचे काम सुरू असल्याने, चाचणीसाठी जागा अपुरी ठरत आहेत. त्यामुळे चारचाकी वाहनांची चाचणी आयडीटीआर येथे आणि दुचाकींच्या चाचणी आळंदी रस्ता येथे होणार आहेत.
आरटीओकडून पक्के लायसन्स देण्यापूर्वी चाचणी घेण्यात येते. यासाठी संगणक प्रणालीमध्ये ऑनलाइन पद्धतीने कोटा देखील निश्चित करण्यात येतो. मात्र, यामध्ये बदल केला आहे. यापूर्वी दुचाकी आणि कार या संवर्गातील चाचणी आळंदी रस्ता चाचणी मैदान येथे आणि कार संवर्गाच्या चाचण्या आयडीटीआर येथे घेतली जाते. मात्र, आळंदी रस्ता चाचणी मैदान येथे ब्रेक टेस्ट ट्रॅक प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे.
पुढील आदेशापर्यंत कार संवर्गातील चाचण्या आरडीटीआर येथे आणि दुचाकी संवर्गातील चाचणी आळंदी रस्ता चाचणी मैदान येथे होणार आहे. अर्जदारांनी आळंदी रस्ता चाचणी मैदान येथील लायसन्स सेवा निवडण्यासाठी सारथी प्रणालीवर अपॉईंटमेंट घेताना शिबिर हा पर्याय निवडावा.