जुन्नर – सराटी (जालना) येथे गेल्या आठवड्यात आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी (दि. 6) जुन्नर शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी शिवजन्मभूमीतील शेकडो मराठा समाज बांधव सहभागी झाले होते.याप्रसंगी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप, आशा बुचके, अमित बेनके, माऊली खंडागळे, बाबू पाटे, मकरंद पाटे आदी नेतेमंडळी सहभागी झाली होती.
याप्रसंगी मराठा वनवास यात्रेचे योगेश केदार यांनी आरक्षणासंदर्भात माहिती दिली व आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. यावेळी सूत्रसंचालन ऍड. सचिन चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रवेश देवकर यांनी केले. यावेळी रवींद्र खिल्लारी, संजय वऱ्हाडी, तुषार लाहोरकर, शिवम घोलप, दीपक कोकणे, संतोष कबाडी, साईनाथ ढमढेरे, गणेश महाबरे, मंदार बूट्टे, विनायक वाबळे, विवेक पापडे, संजय खंडागळे आदी युवक उपस्थित होते. यावेळी जुन्नर शहरात पुकारण्यात आलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. यावेळी दवाखान्यात औषधांची दुकाने व शासकीय कार्यालये वगळता सर्व दुकाने, टपऱ्या बंद होत्या.
तहसील कार्यालयावर
किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर विविध घोषणा देत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. दरम्यान मोर्चा तहसील कार्यालयात आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.