पिरंगुट – मुळशीतील शाळांना दहा ई लर्निंग संच भेट देण्यात आला. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून हे संच उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी दिली.
मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांच्या हस्ते हे किट शाळांना वितरीत करण्यात आले आहे. कोंढूर येथील शाळेतून या उपक्रमाला सुरवात झाली आहे.
ई लर्निंग संच उपलब्ध झालेल्या शाळा पुढीलप्रमाणे अमृतेश्वर माध्यमिक विद्यालय कोंढूर, माध्यमिक विद्यालय कोळावडे, बाबुराव रायरीकर विद्यालय उरवडे, आप्पासाहेब ढमाले माध्यमिक विद्यालय खेचरे,
माध्यमिक विद्यालय काशिग, मुळशी धरण प्रशाला पोमगाव, श्री भैरवनाथ विद्यालय रिहे, स्वामी विवेकानंद विद्यालय आसदे, संपर्क विद्या विकास केंद्र भांबर्डे, संस्कार प्रायमरी स्कुल पिरंगुट.