तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे-एल अँड टी फाटा येथील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने सर्वच वाहन चालक वैतागले आहेत. खड्ड्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह प्रवासी व वाहन चालकांनी केली आहे.
तळेगाव ढमढेरे -एल अँड टी फाटा हा रस्ता माळीमळामार्गे पुढे पुणे -नगर रस्त्याला जोडला आहे. हाच रस्ता तळेगाव ढमढेरे ते कासारी फाटा बाह्यवळ रस्ता पीएमआरडीने तयार केलेला आहे.
हा रस्ता औद्योगिकरणाला जोडला असल्यामुळे वाहन चालकाला सोयीचा झाला. परंतु रस्त्यावर मोठे खड्डे निर्माण झाले आहे. रस्त्यावर प्रत्येक वाहन आदळत असल्याने वाहनांची नुकसान होत आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
“हा रस्ता पीएमआरडीएकडे असून प्रशासनाशी बोलून खड्डे दुरुस्तीसाठी प्रयत्न करणार आहे. रस्त्यासंदर्भात आपण विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून कायमची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तळेगाव ढमढेरे ते कासारी बाह्यवळण रस्त्यावर वेळनदीवर पूल व उर्वरित अर्धवट राहिलेल्या रस्त्यासंदर्भातही अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून त्याची कार्यवाही करण्यासंदर्भात प्रयत्न करणार आहे.”
– अशोक पवार, आमदार, शिरूर.