ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रबळ उमेदवारांवर भिस्त
काटेवाडी – बारामती तालुक्यातील 32 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. स्थानिक नेते बेरजेचे राजकारण करण्यासाठी प्रबळ उमेदवारांचा शोध घेत आहेत. त्यासाठी गावकी आणि भावकीचे राजकारण महत्वाचे ठरणार आहे.
बारामती तालुक्यातील संवेदनशील गावांत निवडणुकांचा धुरळा उडत असल्याने स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीला महत्त्व आले आहे.
बारामती तालुक्यातील काटेवाडी, गुणवडी, डोर्लेवाडी, काळखैरेवाडी, पानसरेवाडी, चांदगुडेवाडी, भोंडवेवाडी, कुतवळवाडी, दंडवाडी, सुपा, सायबांचीवाडी, वंजारवाडी, गाडीखेल, साबळेवाडी, शिर्सूफळ, मानाप्पावस्ती, म्हसोबावाडी, कोऱ्हाळे खुर्द,
आंबी बुद्रुक, पवईमाळ, धुमाळवाडी, चौधरवाडी, मगरवाडी, पारवडी, मेडद, करंजेपूल, करंजे, कऱ्हावागज, जराडवाडी, उंडवडी कडेपठार, मुढाळे, निंबोडी या गावांत स्थानिक नेते, इच्छुक उमेदवार यांचा कस लागला आहे.