ओझर – श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट, श्री क्षेत्र ओझर (ता. जुन्नर) येथे दिवाळी पाडव्यानिमित्त गंगाआरती व दीपोत्सव कार्यक्रम साजरा केला. कुकडी नदीतीरावर गंगा आरतीचे आयोजन केले होते. दीपोत्सव सोहळा उत्साहात पार पडला.
ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे व विश्वस्त मंडळाने सुरू केलेल्या गंगाआरतीच्या संकल्पास प्रतिसाद मिळत आहे. यावेळी पूनम वैभव थोरवे, वैशाली औटी, छाया रवींद्र डुंबरे, शीतल अतुल गोरे, प्राची मंगल कुलकर्णी उपस्थित होत्या. यावेळी गौरी भालचंद्र रवळे यांनी बीएससी फोरेस्ट्री, वनशास्त्र क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन श्रीक्षेत्र ओझरचे नाव महाराष्ट्रात उंचावल्याने देवस्थान ट्रस्टतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दीपोत्सवासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
महिलांच्या वतीने घाटावर पणती लावण्यात आली. यावेळी मुख्य गाभाऱ्यात दिवाळी फराळाची आरस केली होती. हा गंगा आरतीचा उपक्रम ट्रस्ट प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी राबवत असल्याचे अध्यक्ष कवडे यांनी सांगितले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, सचिव दशरथ मांडे, विश्वस्त आनंदराव मांडे, किशोर कवडे, मंगेश मांडे,
ओतूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, माजी विश्वस्त विक्रम कवडे, बाळासाहेब कवडे, ग्रामविकासचे अध्यक्ष संतोष मांडे, ओझरच्या सरपंच अस्मिता कवडे, बबन मांडे, विनायक जाधव, पोलीस पाटील प्रीती कवडे, पोलीस पाटील मोहन कवडे, राजू डुंबरे यांनी यजमान पाहुण्यांचा सत्कार केला. आरतीसाठी गायन राहुल दुधवडे केले. सूत्रसंचालन व्यवस्थापक अशोक घेगडे यांनी केले. विश्वस्त किशोर कवडे यांनी आभार मानले.