रांजणगाव गणपती– वडिलांचे छत्र हरपल्यानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आईने मुलांवर संस्कार करीत त्यांना समाजात आदराचे स्थान देण्यासाठी दिशा दिली. या आईच्या प्रती त्यांचा मुलगा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे व उद्योजक किरण शिंदे यांनी आपल्या कार्यालयाबाहेर आईचा भलामोठा फलक झळकवला आहे. हा फलक येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
ज्ञानाची गंगा माझी आई ,
भक्तीचा सागर माझी आई !
प्रेमाचा सागर माझी आई ,
माझा देव माझी आई !!…
या ऊक्तीप्रमाणे जन्मदाती आई ही आपल्या सर्वांसाठी देवासमान आहे. कारण आई आपल्याला जन्म देऊन हे सुंदर जग दाखवत असते. आपल्याला घडवत असते. आपल्याला नाव व ओळख देत असते. अशा या आईचे आपण उपकार कधीच विसरु व फेडू शकत नाही. आईने जन्म दिल्याच्या बदल्यात आपण आईची सेवा करु शकतो व प्रेम व्यक्त करु शकतो.
वडिलांच्या निधनानंतर आई कौशल्या कांतीलाल शिंदे यांनीच आई व वडिलांची भूमिका निभावून घडवल्यामुळेच आज यशाची शिखरे पादाक्रांत केलेल्या युवासेनेचे जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे व उद्योजक किरण शिंदे यांनी आपल्या कार्यालयाबाहेर आईचा भलामोठा फलक झळकवला आहे. हा फलक येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.