शिक्रापूर – पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे नुकत्याच इंडियन डॉक्टर्स ऑलिम्पिक राष्ट्रीय कॅरम मिक्स डबल्स स्पर्धा झाल्या. स्पर्धेत एकूण १५० डॉक्टर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
यावेळी आयोजित स्पर्धेत सहभागी झालेले शिक्रापूर येथील माऊलीनाथ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अजिंक्य तापकीर व डॉ. सायली तापकीर यांनी संपूर्ण भारतात कॅरम स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून रौप्यपदक पटकाविले आहे.
डॉ. अजिंक्य तापकीर व डॉ. सायली तापकीर यांच्या यशाबद्दल त्यांचे संपूर्ण पुणे जिल्ह्यातून कौतुक होत आहे. डॉक्टरांनी त्यांच्या दैनंदिन कामकाजातून रुग्णसेवा करून आपापले कर्तव्य बजावून छंद जोपासावे व त्यातून यश संपादित करावे, असे डॉ. अजिंक्य तापकीर यांनी सांगितले.