काटेवाडी : श्री संत योगीराज चांगावटेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी काटेवाडी (ता. बारामती) येथील माऊली काटे यांच्या “बादल’ या अश्वाचे सासवड येथे प्रस्थान झाले आहे.
श्री संत योगीराज चांगावटेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा सासवड येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे गुरुवारी (दि. 15) प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी काटेवाडी येथील माऊली काटे यांच्या अश्वाची निवड करण्यात आली असून गेली दहा वर्ष ही सेवा माऊली काटे हे करीत आहेत.
श्री संत योगीराज चांगा वटेश्वर पालखी सोहळ्यास सत्तर वर्षांची परंपरा आहे. काटेवाडी या ठिकाणी बादल या अश्वाचे पूजन हभप सुनील महाराज काटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री छत्रपती साखर कारखान्याचे माजी संचालक तुळशीदास काटे, अनिल काटे, तंटामुक्तीचे अध्यक्ष के. टी. जाधव, तुकाराम काटे, बंटी काटे, सुभाष काटे, बाळासो काटे, कुमार काटे, पप्पू काटे तसेच महिला उपस्थित होत्या.