पुण्यात उत्तम हापूस आंबा पाच रु. डझन! पुणे, दि. 13 – उत्तम हापूस आंबा अडीच रुपये किलो व पाच रुपये डझन या भावात पुण्यातच मिळतो हे किती पुणेकरांना माहिती आहे? आंब्याच्या सीझनमध्ये मंडईत जाऊन आंबा खरेदी करायचा ही पुणेकरांची हौस! परंतु या वर्षी पीकच कमी झाल्याने मंडईत हापूस जास्त दिसलाच नाही. सुरुवातीला 40-50 रुपये डझन या भावात! त्यामुळे यंदा पुणेकरांना हापूस फक्त दुरून पाहण्यातच समाधान मानावे लागले. पण आता सीझनच्या शेवटी अडीच व पाच रुपयांतच हापूस मिळतो आहे. जीवाणू खतांच्या वापरास शासनाने प्राधान्य द्यावे पुणे – रोपाची वाढ करणाऱ्या जीवाणू खतांचा वापर केल्याने उत्पादनात कमीत कमी 10 ते 15 टक्के वाढ होते. म्हणून राज्य शासनाने अशा जीवाणू खतांचा वापर करण्यावर भर द्यावा. मतदारा, रात्र वैऱ्याची आहे पुणे – निवडणुकीच्या प्रचारात एक उमेदवार मतदारांना भल्या पहाटे उठविण्यासाठी “उठी उठी गोपाळा’ हे रेकॉर्ड वाजवून आळवणी करतो, तर रात्री निजताना सुज्ञ मतदारा, जागा राहा, रात्र वैऱ्याची आहे, असा इशारा लाउडस्पीकरवरून देत असतो.