बारामती : पुणे जिल्ह्यातील चिंचवड देवस्थान ट्रस्ट जमीन खरेदी विक्री गैरव्यवहार प्रकरणी पुण्याचे सहाय्यक आयुक्त नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्माराज गंपले आणि राष्ट्रवादीचा नेता पोपट तावरे यांच्यावर दौंड न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत..
याबाबत सविस्तर माहिती अशी की अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव येथे चिंचवड देवस्थान ट्रस्ट च्या मालकीची शेकडो एकर जमीन आहे. यातील खरेदी विक्री प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते पोपट तावरे यांनी फसववणूक केली असल्याबाबतचीं तक्रार किरण शांताराम भोसले व आरती लव्हटे यांनी पोलिसांनाकडे केली होती. पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर राजकीय दबावामुळे यातील मुख्य आरोपी असलेल्या पोपट तावरे यास क्लीन चीट दिली होती. आणि या गुन्ह्यात त्यांचा सहभाग नाही असं न्यायालयास दर्शविले होते.
परंतू पोपट तावरे हे खरेदीदार. असताना ही हेतूपूर्वक त्याना बाजूला ठेवण्यासाठी संबंधित आरोप असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी खोटे कागदपत्र कोर्टात सादर केली असल्याबाबत फिर्यादी यांनी न्यायालयात दाद मागितली होती. यावर दौंड येथील न्यायालयाने महत्वाची निरीक्षण नोंदवली असून पोलीसांनी तावरे यांना तीन गुन्ह्यातून निर्दोष सोडल्याचे दिसून आले आहे.
त्यामुळेच न्यायालयाने पोलिसांच्या कामावर ताशेरे ओढत उपायुक्त नारायण शिरगांवकर, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्मराज गंपले, राष्ट्रवादीचा नेता पोपट तावरे यांच्यावर, कलम 420,464,120ब,192,192,196 अशा विविध गंभीर कलमनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.