चार जणांवर गुन्हा दाखल : तिघे फरार
जुन्नर : शहरातील भर वस्तीतील एका राहत्या घराबाहेर असलेल्या शेडमध्ये रात्रीच्या वेळी पोलिसांनी धाड घालून तेथे बेकायदेशीरपणे कत्तल केलेले 653 किलो गोमांस जप्त करण्यात येऊन याप्रकरणी चार जणांविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिलाल कुरेशी, मुदसर कुरेशी, साहिल मुजावर, शब्बीर कुरेशी (सर्व रा. जुन्नर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर पोलीस अंमलदार विनोद पवार यांनी फिर्याद दिली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, अंमलदार दादा पावडे, दीपक वनवे, विनोद पवार, होमगार्ड जवान पठाण, नायकवडी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
माई मोहल्ला येथील मुदसर कुरेशी यांच्या राहत्या घराबाहेर एका शेडमध्ये पोलीस पथकाने जाऊन पाहणी केली असता बेकायदा जनावरांची कत्तल करून तेथे ठेवलेले 653 किलो गोवंश गोमांस ताब्यात घेण्यात आले. यावेळी तेथे असलेल्या चार जणांपैकी तीन जण पळून गेले. पुढील तपास सहायक फौजदार गिजरे करीत आहेत.