Pune Crime : भारती विद्यापीठ पोलिसांकडून ‘वॉंंटेड’ गुन्हेगार ‘जेरबंद’

दरोडा, चोरी, खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगल्याचे गुन्हे

पुणे – पिंपरी -चिंचवड व ग्रामीण परिसरात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. तो एका खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात गुन्हा घडल्यापासून फरार होता.

दत्ता अशोक शिंदे(24,रा.राहु,दौंड) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो यवत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात 9 जुलै 2020 पासून फरार होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दत्ता शिंदे हा दत्तनगर चौकाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावर थांबला असल्याची खबर पोलीस अंमलदार योगेश सुळ व अमोल सोनटक्के यांना मिळाली होती.

त्यानूसार आनंद दरबारजवळ त्याला गाठण्यात आले. पोलीस आल्याचे बघताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी लागलीच त्याला पकडले. त्याला पुढील कारवाईसाठी यवत पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

दत्ता शिंदेवर भोसरी, दिघी, शिरुर, पिंपरी, ठाणे, बारामती, यवत पोलीस ठाण्यात दरोडा, चोरी, खुनाचा प्रयत्न, अवैध्य शस्त्र बाळगणे असे तब्बल दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई उपायुक्त सागर पाटील, सहायक आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल म्हेत्रे, अंमलदार संतोष खताळ, योगेश सुळ, अमोल सोनटक्के यांच्या पथकाने केली

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.