पुणे – खूनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या दोघा सख्या भावांना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. जुल्फीकार नजीर शेख (वय.32), मुस्तफा नजीर (वय.27,राहणार दोघेही रविवारपेठ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पुढील कारवाईसाठी दोघांना फरासखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
शहरातील विविध गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना पोलिस कर्मचारी सुमित ताकपेरे यांना फरासखाना पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील दोघे आरोपी जुल्फिकार व मुस्तफा हे दोघे शुक्रवारपेठ येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता दोघांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.