पुणे – जमीनीच्या व्यवहारात अनेकांना गंडा घालून दिड वर्षापासून फरार असलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बर्हाटे याच्या मुलाला गुरुवारी रात्री गुन्हे शाखेने अटक केली ़़ त्याची पत्नी संगिता रविंद्र बर्हाटे (वय.49,रा. धनकवडी) हिला गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री उशीरा अटक केली होती.
हडपसर पोलिस ठाण्यात सुमंत रंगनाथ देठे (वय 58, रा. मांजरी ग्रीन, मांजरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात पत्नी संगीता हिला अटक करण्यात आले आहे. विविध कलमासह महाराष्ट्र सावकारी अध़ि 39, 45 आणि अनु़ जाती व अनु़ जमाती कायद्याखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यात मयूर रविंद्र बर्हाटे यालाही अटक करण्यात आली आहे.
संबंधीत गुन्ह्यात कथीत पत्रकार देवेंद्र जैन, रविंद्र बर्हाटे याच्यासह 13 जणांवर मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. रविंद्र बर्हाटेच्या संपर्कात राहून कटात सहभागी झाल्याच्या कारणातून ही अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.
गुन्हा दाखल झाल्यापासून रविंद्र बर्हाटे हा पोलिसांना गुंगारा देतो आहे. गुन्हे शाखेच्या पथकासह स्थानिक पोलिसांची पथके त्याच्या मागावर आहेत. मात्र अद्याप तो सापडलेला नाही. कटात सहभागी झाल्याच्या आरोपावरून यापुर्वी देखील काहींना अटक करण्यात आली आहे.बर्हाटे मागील एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत आहे.