पुणे – जबरी चोरी करणाऱ्या तीघा आरोपीस लोणीकंद पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा आठ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सागर कैलास नवले (31, रा. नवलेमळा, राहु, ता. दौंड, ), सागर बापु मेमाणे (29, रा.मेमाणवाडी, ता. दौंड ), सुनिल जनार्धन ढवळे (28, रा. मेमाणवाडी, ता. दौंड ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत 26 जून रोजी रात्री प्रिकास्ट कंपनी समोरील वाडेबोल्हाई आष्टापुर रोडने फिर्यादी टाटा टेम्पो घेवुन जात असताना स्कॉर्पीओ गाडीने पाठीमागुन येवुन टेम्पोचे पुढे गाडी आडवी लावली. त्यानंतर त्यातील तोंडाला मास्क लावलेले दोन अनोळखी इसमांनी खाली उतरुन शिवीगाळ करुन जबरदस्तीने टेम्पोची चावी व खिशातील मोबाइल काढुन गाडीतुन फिर्यादीला खाली उतरावुन टेम्पो घेवुन गेले होते.
दरम्यान पेट्रोलींग करीत असताना पोलीस अमंलदार समीर पिलाणे व बाळासाहेब तनपुरे यांना खबर मिळाली की आरोपी हे गुन्हयातील टेम्पोसह मौजे न्हावी सांडस गांवचे हद्दीत आले आहेत. त्याची उप निरीक्षक सुरज किरण गोरे यांनी खात्री करुन आरोपींना जेरबंद केले. त्यांचे कडुन जबरीने चोरुन नेलेला टेम्पो,मोबाईल तसेच गुन्हयात वापरलेली स्कॉपीओ असा 8 लाख 5 हजाराचा माल जप्त करुन सदर दाखल गुन्हा उघडकीस आणला.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सुरज किरण गोरे, सहा. फौजदार मोहन वाळके, पोलीस अंमलदार कैलास साळुके, अजित फरांदे, पोना विनायक साळवे, पोलीस अंमलदार समीर पिलाणे, सागर कडु, बाळासाहेब तनपुरे यांनी केली.