पुणे – बायको बाळंतपणासाठी माहेरी गेल्यानंतर 14 वर्षीय मुलीला वासनेची शिकार करणाऱ्या रामेश्वर हरिश्चंद्र हंगरगे (वय 30) यास सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली. अतिरिक्त सत्र न्यायाधिश एस.जी.पोंक्षे यांनी त्याला 24 मार्च पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिला.
सप्टेंबर 2021 ते 18 मार्च 2022 दरम्यान हा प्रकार घडला. याबाबत 14 वर्षीय पिडीतेने सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद दिली आहे. रामेश्वर याने पीडितेस आई-वडीलांना व भावाला मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच, पीडितेला घाबरवून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादित नमूद केले आहे.
याप्रकरणी, आरोपीला अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.