Pune Crime | आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा; गुन्हा दाखल

पुणे – आभासी चलनात गुंतवणूक करण्याच्या आमिषाने मित्राची फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संजय लक्ष्मण अवघडे (रा. पांडुरंग) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आाहे.

अर्जुन लक्ष्मण कारी (रा.बालाजीनगर, धनकवडी) याने यासंदर्भात सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अर्जुन आणि संजय मित्र आहेत. अर्जुन छायाचित्रकार आहे. आरोपी अवघडे शेअरमध्ये गुंतवणूक करायचा.

संजयने त्याला आभासी चलनात (बिटकॉईन) गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले होते. गुंतवणूक केलेली रक्कम परत न मिळाल्याने अर्जुनने नुकतीच सायबर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक सागर पडवळ तपास करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.