पुणे – खंडणी विरोधी पथकाने(2) मोबाईल शॉपी फोडू मोबाईल चोरणाऱ्या पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या मोबाईलसह वॅगन आर कार हस्तगत करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, खंडणी विरोधी पथक गस्त घालत असताना दोन व्यक्ती खडकी बाजार बस स्टॅंड पुणे येथे मोबाईल विक्री करत असल्याची माहिती पोलीस हवालदार विनोद साळुंके व सुरेंद्र जगदाळे यांना मिळाली. त्यानूसार सापळा रचून डेव्हिड समुयल खंडागळे ( बोपोडी) व आतीक अब्दुल आलीम शेख ( खडकी बाजार ) पकडण्यात आले.
त्यांची चौकशी केली असता त्यांनी इतर साथीदारांसोबत औंधगाव येथील मोबाईल शॉपी फोडून मोबाईल चोरल्याची कबुली दिली तसेच इतर साथीदार हे मोबाईल विक्री करिता मुळारोड येथील श्री सत्यम सोसायटी येथे येणार असल्याची माहिती दिली.
त्यानूसार रवी रामचंद्र कोळी (रा.बोपोडी), ओमकार सुधाकर परमवार ( खडकी) ,ऋषिकेश राकेश तांबे ( गुरव पिंपळे) यांना मोबाईल सह ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी खडकी येथून मारुती व्हॅगनार कार चोरी करून ती कार घेऊन औंधगाव येथे मोबाईल शोपी चे शटर उचकटून चोरी केल्याचे सांगितले. त्यानूसार गुन्हयात वापरुन मोकळ्या जागेत सोडलेली कारही हस्तगत करण्यात आली.
त्यांच्या ताब्यातून एकूण मोबाईल हॅंडसेट, मोबाईल हेडफोन, चार्जिंग केबल, ब्लूटूथ स्पीकर , वायरलेस हेडफोन वेगनार कार जप्त करण्यात आली आहे. आरोपींना पुढील तपास कामी चतूशृंगी पोलिस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शन खाली. पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनि श्रीकांत चव्हाण, सहायक फौजदार बाबा अवचरे, सहा फौजदार गुरव, पोलीस अंमलदार विनोद साळुंके, शैलेश सुर्वे, सुरेंद्र जगदाळे पोहवा राहुल उत्तरकर, सचिन अहीवळे, संग्राम शिनगारे, पिलाने ,शिरवळकर यांच्या पथकाने केली आहे.