पुणे – किरकाेळ वादातून एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना कोथरूडमधील सुतारदरा भागात घडली. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सचिन नवस्कर (वय ३१, रा. सुतारदरा, कोथरूड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गणेश माझिरे, समीर पडवळ, रोहित ढोकणे (तिघे रा. सुतारदरा, कोथरूड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवस्करने याबाबत कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नवस्कर आणि आरोपींमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. तीन दिवसांपूर्वी नवस्कर सुतारदरा परिसरातील पीठाच्या गिरणीजवळ रात्री साडेअकराच्या सुमारास थांबला होता. त्या वेळी आरोपींनी नवस्करला शिवीगाळ केली. त्याच्यावर कोयत्याने वार केले. आरोपी पसार झाले असून पोलीस उपनिरीक्षक एन. बी. क्षीरसागर तपास करत आहेत.