पुणे – ४५ लाखांहून अधिक लोकसंख्या आणि क्षेत्रफळाने राज्यात सर्वात मोठी महापालिका असलेल्या पुणे महापालिकेस अग्निशमन दलासाठी ५० कंत्राटी कर्मचारी घेण्याची वेळ आली आहे.
अग्निशमन दलासाठी १२० पद मंजूर असून, सध्या केवळ ३८३ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे अग्निशमन केंद्राच्या कामकाजासाठी कर्मचारीच नसल्याने ५० फायरमन कंत्राटी पद्धतीने भरण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. दरम्यान, अग्निशमन विभागाने १५०कर्मचाऱ्यांची मागणी केली होती.
मोठ्या महापालिकांसाठी अग्निशमन दलाची एकत्रित सेवा नियमावली शासन तयार करणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव पडून असून वारंवार मागणी करूनही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे अग्निशमन दलाच्या मुख्य कार्यालयासह शहरातील इतर 13 उपप्रादेशिक कार्यालयांत कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.
शहराच्या आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी अग्निशमन दलाकडे आहे. मात्र, त्याच वेळी ५० टक्क्यांपेक्षा कमी कर्मचारी असल्याने अनेकदा कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी अनेक केंद्रावर अवघे दोन ते तीन फायरमन कार्यरत असतात. तर त्यांच्यावर जवळपास ३ ते ५ लाख लोकसंख्येची जबाबदारी असते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मदतीसाठी या ५० कंत्राटी कर्मचान्यांची नियुक्ती केली जाणार असून, त्यासाठी येणाऱ्या ६४ लाखांच्या खर्चास समितीने मान्यता दिली आहे.