पुणे – शहरात बुधवारी नव्याने 4 हजार 857 करोना बाधित सापडले. तर 1 हजार 805 जण करोनामुक्त झाले. गेल्या 24 तासांत नवीन बाधितांच्या संख्येत दीड हजारांनी वाढ झाल्यामुळे सक्रीय बाधित संख्या 22 हजार 503 वर पोहचली. मात्र, रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे.
बुधवारी दिवसभरात 20 हजार 801 संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 4 हजार 857 बाधित सापडले. सध्या 19 बाधित व्हेंटिलेटरवर असून, 162 जणांना ऑक्सिजन लावण्यात आलेला आहे. करोनामुळे दिवसभरात एका मृत्युची नोंद झाली आहे, असे मनपा आरोग्य विभागाने सांगितले.