पुणे – करोनाची तिसरी लाट आता ओसरू लागली आहे. दरम्यान, शुक्रवारी ७०० नवीन बाधितांची नोंद झाली. तर दिवसभरात २ हजार १९७ जण करोनामुक्त झाले आहेत. शहरातील आजचा बाधित दर १०.८७ टक्के इतका आहे.
दिवसभरात ६ हजार ४४८ संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली. दरम्यान, शुक्रवारी मृत्यूच्या संख्येतही घट झाल्याचे दिसून येते. शहरात दिवसभरात २ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, सक्रीय बाधित संख्या ७ हजार ४८९ इतकी असून, त्यातील ३५ बाधितांची प्रकृती चिंताजनक आहे. तर २०४ बाधित ऑक्सिजनवर आहेत.