पुणे – समृध्दी जवीन पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेष्ण (सीआयडी) पथकाने गुरुवारी पुण्यातील औंध परिसरातील भूमकर चाैक, नऱ्हे आंबेगाव, उस्मानाबाद याठिकाणी समृद्द जीवनचे कार्यालय, फ्लॅट आदी ठिकाणी छापेमारी केली तसेच महत्वपूर्ण कागदपत्रे, फाईल्स जप्त केल्याची माहिती सीआयडीचे पाेलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी दिली आहे.
समृद्द जीवनचे संस्थापक महेश माेतेवार यांची पत्नी वैशाली माेतेवर हिच्याकडे सीआयडीने चाैकशी केली त्यावेळी तिने समृद्द जीवनचे कागदपत्रांबाबत माहिती सीआयडीला दिली. अनेक गुंतवणुकदारांना समृध्द जीवनने पैसे परत केले असून अद्याप काही ठेवीदारांना पैसे द्यावयाचे असून त्याबाबतचे फाईल नेमके कुठे आहे याची माहिती तीने सीआयडीला दिल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यानंतर गुरुवारी सीआयडीचे पथकाने पुणे व उस्मानाबाद मध्ये तीन ते चार ठिकाणी छापे टाकले.
यावेळी फाॅरेन्सिक ऑडीटचे पथकही सीआयडीच्या मदतीस हाेते. संबंधित छापेमारी करण्यात आलेल्या फ्लॅट व ऑफिसेस मध्ये माेठया प्रमाणात कागदपत्रे मिळून आल्याने ती पुढील तपासाकरिता जप्त करण्यात आली आहे. संबंधित कागदपत्रांचे विश्लेषण केल्यानंतरच आवश्यक ती माहिती सीआयडीला मिळू शकेल अशी अपेक्षा आहे.