पुणे – किरकोळ कारणावरून शिवाजीनगर गावठाण परिसरामध्ये कोयता व दगडाचा वापर करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला होता. 13 मार्च 2023 रोजी घडलेल्या या घटनेमध्ये शिवाजीनगर पोलिसांनी सनी साळूंखे व राज साळूंखे या दोघांना अटक केली होती. त्यापैकी राज याला जामीन झाला आहे.
त्याने ऍड. प्रणित नामदे व ऍड. अजित पवार यांच्या मार्फत जामीनाकरिता सत्र न्यायाधीश एस.जी. वेदपाठक यांच्या न्यायालयात अर्ज केला होता. त्यावेळी गुन्ह्यातील जखमी व प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार यांच्या जबाबामध्ये तफावत असल्याचे प्रथमदर्शी निदर्शनात येत आहे. तसेच त्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे इतर जास्त गुन्हे नाहीत. त्याचप्रमाणे जो जखमी आहे. त्याने आरोपींना खोट्या गुन्ह्यात अडकवले आहे. हा ऍड. नामदे आणि ऍड. पवार यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने जामीन मंजुर केला.