पुणे – बेकायदेशीरपणे गांजा बाळगल्याप्रकरणात एकाला 15 हजार रुपयांचा जामीन सत्र न्यायाधीश ए.एन.मरे यांनी मंजुर केला आहे. व्यंकट श्रवण गवंडी (वय 28, रा. लातुर) असे त्याचे नाव आहे. न्यायालयीन कोठडीत असताना त्याने ऍड. श्रीकृष्ण घुगे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.
जप्त करण्यात आलेला माल कमी प्रमाणात आहे. त्यामुळे एनडीपीस ऍक्टचे कलम 37 लागू होत नाही. तपास पूर्ण झाला आहे. त्याला जामीन देण्याची मागणी ऍड. श्रीकृष्ण घुगे यांनी केली. या प्रकरणात आणखी एकावर गुन्हा दाखल आहे. पोलीस शिपाई समीर रासकर यांनी भोसरी पोलिसात फिर्याद दिली आहे. 7 सप्टेंबर 2021 रोजी कासारवाडी रेल्वे स्टेशन येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी 4 किलो 338 ग्रॅम वजनाचा 90 हजार 650 रुपयांचा गांजा जप्त केला होता.