पुणे – दारु पिण्यासाठी पैसे मागण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणामध्ये तरुणावर गोळीबार करून दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. हि घटना रविवारी रात्री बिबवेवाडी परिसरात घडली.
सौरभ दत्तु सरवदे (वय 22, रा. पर्वती पायथा), मुन्ना ऊर्फ अनिस फारूक सय्यद (वय 19), बापू ऊर्फ आकाश सुरेश शिळीमकर (वय 19), जंब्या ऊर्फ ऋषिकेश विठ्ठल साळुंखे (वय 21, तिघेही रा. जनता वसाहत, दत्तवाडी), आकाश सुरजनाथ सहाणी (वय 24, रा. पर्वती), बाब्या ऊर्फ आदित्य संजय नलावडे (वय 20, रा. पर्वती पायथा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून एक पिस्तुल व तलवार जप्त केली. याप्रकरणी अमित कैलास थोपटे (वय 32, रा. बिबवेवाडी) याने फिर्याद दिली आहे.
थोपटे याचे दत्तवाडी भागात सलून आहे. काही दिवसांपूर्वी थोपडे व त्याचा मित्र सुरज झिटे यांची सौरभ सरवदे व रुपेण सोनवणे यांच्याशी दारुसाठी पैसे मागितल्याच्या रागातून भांडणे झाली होती. सरवदे, गणेश जगदाळे व त्यांचे साथीदार रविवारी रात्री थोपटे व त्याचा मित्र थांबलेल्या शिवशंकर सोसायटीच्या परिसरात गेले. तेथे त्यांनी थोपटेला शिविगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. तर सरवदे याने त्याच्याकडील पिस्तुल थोपटेवर रोखले. या घटनेनंतर थोपटे, त्याचा मित्र व भाऊ तेथून पळून गेले. सरवदेने थोपटेच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या, मात्र थोपटलेला गोळी लागली नाही.
दरम्यान, मुख्य आरोपी सौरभ सरवदे हा त्याच्या आईला भेटण्यासाठी जनता वसाहत परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, त्यास सापळा रचून अटक केली. चौकशीत त्याने अन्य आरोपी सिंहगड परिसरातील जंगलात लपून बसले असून रात्रीच्या ते त्यांच्या घरी जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सय्यद, शिळीमकर व साळुंखे यांना अटक केली. तर सहाणी व नलावडे यांना गुन्हे शाखेच्या युनीट पाच व तीनच्या पथकाने अटक केली.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस अंमलदार शाम लोहोमकर, गणेश दुधाणे, अमित पुजारी, तानाजी सागर, सतिश मोरे, अतुल महांगडे, श्रीकांत कुलकर्णी यांच्या पथकाने केली.