पुणे – जमिनीचा जबरदस्ती ताबा घेण्याचा प्रयत्न करुन तोडफोड केल्याप्रकरणी 25 ते 30 जणांविरुद्द कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेशकुमार बोलाद्रा(44,रा.धायरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार अब्दुल तयब कुरेशी बहरीणवाला(रा.लष्कर), हुजेफा कुरेशी बहरीणवाला, मुस्तफा कुरेशी आणी इतर 20 ते 25 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सुरेशकुमार यांची कोंढवा येथे वडिलोपर्जीत जमिन आहे. त्यांच्या वीस गुंठे जागेमध्ये आरोपी बेकायदेशीरपणे घुसले. यानंतर तेथील सामान आणी सीसीटीव्हीची तोडफोड केली. तसेच तेथील डेव्हलपींग सुपरवायझर अमित राजेश उणेसा यांना शिवीगाळ व दमदाटी करुन सुरेशकुमार यांच्या जागेमध्ये बेकायदा अतिक्रमण केले आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करत
सुरेश कुमार आणी बहरीणवाला या दोघांनीही संबंधीत जागेवर दावा सांगितला आहे. त्यांच्याकडे तशी कागदपत्रेही आहेत. त्यांच्यात वाद झाल्यानंतर अतिक्रमण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.