पुणे – भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना खडकीतील होळकर पूल परिसरात घडली. संदीप अमृतसिंग गौड (वय ४८, रा. धायरकर वस्ती, मुंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
गौड यांचे मेहूणे नितीन साळुंके (वय ३४) यांनी यासंदर्भात खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार गौड खडकीतील कटक मंडळाच्या नाक्याजवळून होळकर पुलाकडे सायंकाळी सहाच्या सुमारास निघाले होते. त्या वेळी भरधाव वाहनाने दुचाकीस्वार गौड यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता पसार झालेल्या वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक विकास शिंदे तपास करत आहेत.