पुणे – दिवसभरात नव्याने 2 हजार 451 बाधित सापडले असून, सुमारे साडेतीन हजार म्हणजे 3 हजार 491 बाधितांना डिस्चार्ज मिळाला आहे. नव्या बधितांपेक्षा डिस्चार्जची संख्या जास्त आहे.
बरे होणाऱ्या बाधितांचे प्रमाण जरी जास्त असले तरी अद्याप मृत्युमुखी पडणाऱ्या बाधितांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत 85 जणांचा मृत्यू झाला असून, 64 जण पुण्यातील आणि 21 जण पुण्याबाहेरील आहेत. बाधितांमध्ये 38 हजार 481 सक्रिय बाधित असून, त्यातील 1 हजार 411 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. तर, 6 हजार 389 बाधित ऑक्सिजनवर आहेत.
दिवसभरातील 64 मृतांचा समावेश करून आजपर्यंत 7 हजार 245 बाधितांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 4 लाख 41 हजार 702 जण बाधित झाले असून, त्यातील 3 लाख 95 हजार 976 बरे झाले आहेत.