पुणे – गार्गी बाय पी एन गाडगीळ अँड सन्सने प्रीमियम फॅशन ज्वेलरी ब्रँडने १४ कॅरेटचे हिऱ्याचे दागिने लाँच केले असून, आगामी काळात १४ कॅरेटचे दागिने देशभर उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्यासाठी शॉप इन शॉप, ई-कॉमर्सचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती गार्गी बाय पीएनजी सन्सचे संचालक आदित्य मोडक यांनी दिली.
वाकड येथील फिनिक्स मॉल ऑफ मिलेनियममध्ये गार्गीचे नवे स्टोअर बुधवारी सुरू झाले असून, पुण्यातील ते तिसरे स्टँड अलोन स्टोअर आहे. ब्रँडचे वाशी येथे फ्रँचायझी स्टोअर आहे. ब्रँडचे प्रवर्तक अजित गाडगीळ आणि रेणू गाडगीळ यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी अंजली गाडगीळ, पीएनजी सन्सचे संचालक-सीइओ अमित मोडक यांच्यासह सतीश कुबेर, श्रीकांत कुबेर आदी उपस्थित होते.
हिऱ्याच्या दागिन्याबाबत आदित्य मोडक म्हणाले, “हिऱ्याच्या दागिन्यांना मागणी वाढत असून, प्रामुख्याने तरुणांकडून ती अधिक आहे. सुरुवातीस १४ कॅरेट हिऱ्याचे दागिने गार्गीची स्टोअर, फ्रँचायझी व पीएनजी सन्सच्या २९ शोरूममधून उपलब्ध असतील. पुढील टप्प्यात देशपातळीवर एसआयएस व ई-कॉमर्सवरून देशभर विक्री केली जाईल. तरुणांबरोबरच फॅशन व स्टाइल स्टेटमेंट पसंत करणाऱ्या ग्राहकांवर आम्ही भर देणार आहोत.”
ब्रँडचे प्रवर्तक अजित गाडगीळ म्हणाले, “१४ कॅरेट नॅचरल हिऱ्याचे सर्टिफाइड दागिने हे नॅचरल प्रकारातील व जागतिक गुणवत्तेनुसार आहेत. तसेच, आमचे खरेदी-विक्रीचे (बाय बॅक आणि एक्स्चेंज) धोरण पारदर्शी असून, प्रत्येकाला हिऱ्याचे दागिने खरेदी करता येतील, अशा पद्धतीने त्याच्या किमती आहेत. १४ कॅरेट हिऱ्याच्या दागिन्यांत नेकपीस, पेंडंट सेट्स, इअररिंग्स, ब्रेसलेट्स, फिंगर रिंग्सची ट्रेंडी व डेलिवेअरची मोठी रेंज उपलब्ध करून दिली आहे.”