हडपसर – येथील सय्यदनगर भागात आयडियल एज्युकेशन ट्रस्ट व हडपसर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला मेळावा व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आला. यावेळी या भागातील दोन हजारांहून अधिक महिलांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी महिलांसाठी शासकीय योजनांची माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. हि पुस्तिका ब्लॉक अध्यक्ष शोएब शफी इनामदार यांच्या वतीने नागरिकांमध्ये वितरित करण्यात आली.
यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे, शफी इनामदार, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, महिला अध्यक्ष पूजा आनंद, एन.एस.यु.आय. प्रदेश अध्यक्ष आमिर शेख, नगरसेविका नंदा लोणकर, आरती बाबर, पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर, शकीला इनामदार,
उर्दू मुख्याध्यापिका नौशादआपा शेख, फरहत आपा, शहेनाझ आपा, पल्लवी सुरसे, लालासाहेब शेख, ख्वाजा पठाण, प्रशांत सुरसे, अमित घुले, नूर शेख उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन फहीम इनामदार, विद्यार्थी काँग्रेसचे सोहेल लांडगे, मुसाएब शेख यांनी केले. सूत्रसंचालन इम्रान शेख तर आभार रिफान इनामदार यांनी मानले.