जिमी शेरगीलचा मेन रोल असलेला “कॉलर बॉम्ब’ 9 जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ही एका पोलीस अधिकाऱ्याची कथा असून त्यामध्ये अनेक गुन्ह्यांचा तपास करताना हा पोलीस अधिकारी दिसणार आहे. अर्थातच हा लीड रोल जिमी शेरगील करणार आहे.
जिमी शेरगीलने यापूर्वीदेखील पोलीस अधिकाऱ्याचे रोल केले आहेत. मात्र, ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या सिरीजमध्ये तो प्रथमच दीर्घ कालावधीच्या पोलीस अधिकाऱ्याच्या रोलमध्ये दिसणार आहे. जटिल आणि गडद अशी ही भूमिका आहे.
या भूमिकामध्ये आपल्याला बऱ्याच भावना साकारण्यास वाव मिळाला आहे, असे जिमी शेरगीलने सांगितले. या सिनेमात अनेक अनपेक्षित प्लॉट ट्विस्ट आणि धक्कादायक घटना आहेत ज्या यापूर्वी कधीही पाहिल्या गेलेल्या नसाव्यात.
पोलिसांच्या आयुष्यात घडणारी अप्रत्यक्ष ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवतील. त्यामुळे या सिनेमात खूपच थ्रील असणार आहे, असेही त्याने सांगितले. निखिल नायर लिखित आणि ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित या चित्रपटात गुन्हेगारी, थ्रिलर, ऍक्शन, गूढ आणि बरेच काही यांचे परिपूर्ण मिश्रण आहे.