फरहान अख्तर याची मुख भूमिका असलेल्या “तुफान’ या चित्रपटाची त्याचे चाहते वाट पाहात आहेत. त्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण हा बहुचर्चित चित्रपट ऍमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 16 जुलैला रिलीज होणार आहे.
याबाबत ऍमेझॉन प्राइम व्हिडिओने फरहान अख्तर आणि परेश रावल यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. “तुफान’ या चित्रपटात फरहान वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. कारण तो बॉक्सरची भूमिका साकारत आहे. बॉक्सरसाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे.
या अगोदर “भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात त्याने घेतलेली मेहनत सर्वश्रुत आहे. हा चित्रपट मुंबईतील डोंगरी भागातील एका मुलाच्या आयुष्यावरील आधारित आहे. अंडरवर्ल्डच्या जगापासून स्वत:ला वेगळे ठेवून तो नवा आदर्श निर्माण करतो.
ऍमेझॉन प्राइम व्हिडिओने नुकतचं “तुफान’ या बहुचर्चित, प्रेरणादायी स्पोर्टस ड्रामा चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात फरहान अख्तर आणि परेश रावलशिवाय मृणाल ठाकूर, सुप्रिया पाठक कपूर, डॉ. मोहन आगाशे यांच्या भूमिका आहेत.