नवी दिल्ली – एसएस राजामौली यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘रौद्रम रणम रुधिरम’ म्हणजे ‘आरआरआर’ प्रदर्शित झाल्यापासूनच हा चित्रपट सतत चर्चेत असल्याचं दिसून येत आहे. सिनेरसिकांना या चित्रपटात राम चरण, ज्यूनियर एनटीआर, आलिया भट्ट आणि अजय देवगण यासारखे दिग्गज कलाकार आणि त्यांचा जबरदस्त अभिनयन अनुभवता आला. आणि त्यामुळेच आज या चित्रपटाची चर्चा फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रापार देखील रंगली आहे.
काही दिवसांपूर्वीच ‘आरआरआर या ऐतिहासिक चित्रपटातील ‘नाटु नाटु’ या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे. या लोकप्रिय तेलुगू चित्रपटाच्या गाण्याने अनेक हॉलिवूड गाण्यांना मागे टाकत हे नामांकन पटकावले.
And the HCA Award for Best Action Film goes to…
🏆 RRR#RRR #RRRMovie #RamCharan #SSRajamouli #NTRamaRaoJr #HCAFilmAwards #BestActionFilm pic.twitter.com/8w9jnc7R0z
— Hollywood Critics Association (@HCAcritics) February 25, 2023
दरम्यान, अश्यातच या चित्रपटाने आणखी एक मनाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला आहे. आरआरआर चित्रपटाने ‘हॉलीवुड क्रिटिक एसोशिएशन अवॉर्ड 2023’ वर देखील स्वतःचं नाव कोरलं आहे. चित्रपटाला आता एकूण चार पुरस्कार मिळाले आहेत. एस एस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाला आता बेस्ट इंटरनेशनल फिल्म कॅटेगरीसाठी पुरस्कार मिळाला आहे.
नुकतीच हॉलीवुड क्रिटिक एसोशिएशन अवॉर्ड 2023 ची घोषणा झाली. हा पुरस्कार सोहळा जगातला मानाचा पुरस्कार सोहळा मानला जातो. आणि यामध्ये ‘आरआरआर’ चित्रपटाला देखील बेस्ट इंटरनेशनल फिल्म कॅटेगरीसाठी पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे आता भारतीय सिनेमांचा डंका हॉलिवूडमध्ये देखील गाजत असल्याचं पाहायला मिळालं आहे.