- दोन तरुणींची सुटका
पिंपरी – वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या स्पा सेंटरवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारून दोन तरुणींची सुटका केली. तसेच एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिबवेवाडी पुणे येथे राहणाऱ्या एका 35 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक फाट्याजवळ सागर कॉर्नर या बिल्डिंगमध्ये व्हीआयपी स्पा अँड ब्युटी या सेंटरमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाने या स्पा सेंटरवर छापा मारला. त्यात मॅनेजर असलेल्या एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली आहे. कारवाईमध्ये एकूण 31 हजार 755 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.