मुंबई – टीव्ही जगतात सर्वाधिक टीआरपी असलेला शो म्हणून हिंदी ‘बिग बॉस’कडे पाहिले जाते. अभिनेता सलमान खान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असतो. सध्याचा ‘बिग बॉस 16’चा सिझन पहिल्याच दिवसापासून वादळी ठरत आला होता. यंदाचा सीजन अनेक कारणांमुळे चर्चेत ठरला आहे. घरातील भांडण असो व स्पर्धकांमधील मैत्रीचं नातं हे सगळंच प्रेक्षकांचं जोरदार मनोरंजन करत आहे. दरम्यान, 19 आठवड्यांच्या दीर्घ पर्वाला नुकतंच नवा विजेता मिळाला आहे.
शिव ठाकरे, प्रियंका चाहर चौधरी, एमसी स्टॅन, अर्चना गौतम आणि शालीन भनोट या टॉप 5 स्पर्धकांमध्ये बिग बॉस 16 चा महाअंतिम सोहळा रंगला. फिनाले सुरू होताच काहीच तासात आधी शालीन आणि त्यानंतर अर्चना घराबाहेर पडले. त्यानंतर विजेतेपदाचा महत्त्वाचा दावेदार असणाऱ्या प्रियंकाला घराबाहेर जावे लागले. ती विजेता होईल असे लाखो चाहत्यांना वाटत होते.
मात्र बिग बॉसच्या ट्रॉफीवर वेगळ्याच स्पर्धकाचं नाव लिहिलं होतं. फायनलमध्ये शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन हे दोघेजण होते. वोट सर्वात जास्त मिळाल्याने ‘एमसी स्टॅन ‘हा बिग बॉस 16 चा विजेता झाला. त्यानंतर बिग बॉसचे माजी स्पर्धक अंकित गुप्ता आणि गौतम विज यांनी खुलेपणे नाराजीही व्यक्त केली होती. आता प्रियांका चहर चौधरीची प्रतिक्रिया समोर आली आहे.
नुकतंच पापाराझींनी प्रियांकाला घेरलं. त्यावेळी त्यांनी तिला एमसी स्टॅनविषयी प्रतिक्रिया विचारली. सुरुवातीला तिने तिला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमाविषयी प्रतिक्रिया दिली. “माझ्यावर असाच प्रेमाचा वर्षाव करत राहा. प्रेम जितकं मिळेल तितकं कमी असतं’ असं ती म्हणाली.
View this post on Instagram
त्यानंतर प्रियांका पुढे म्हणाली, ‘एमसी स्टॅन अमेझिंग आहे, त्याची पर्सनॅलिटी खरी आहे…’ इतकंच बोलून प्रियंका तिथून निघून गेली. दरम्यान, ज्यावेळी एमसी स्टॅनच्या नावाचा उल्लेख झाला तेव्हा प्रियंकाचा मूड बदलला आणि ती निघून गेली..’ असं एका नेटकाऱ्यानी म्हंटल आहे.