मुंबई – कार्तिक आर्यन त्याच्या शहजादा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणतीही कसर सोडत नाही. कार्तिकने दिल्लीतील इंडिया गेटपासून दुबईतील बुर्ज खलिफापर्यंत चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले आहे. नुकतेच कार्तिकने दिल्लीच्या इंडिया गेटवर चित्रपटाचे प्रमोशन केले. त्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर जगातील सर्वात उंच इमारती असलेल्या बुर्ज खलिफावर दाखवण्यात आला आहे.
कार्तिक देखील चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बुर्ज खलिफा येथे पोहोचला होता. कार्तिकसह त्याचे अनेक चाहते या खास क्षणासाठी इमारतीच्या आसपास दाखले झाले होते. यावेळी कार्तिकने काळी स्टायलिश जीन्स आणि टी-शर्टसह हिरव्या रंगाचा कोट घातला होता. प्रमोशनसाठी कार्तिक कार्तिकने अनेक चाहत्यांसोबत सेल्फी देखील काढले.
कार्तिक आर्यन या चित्रपटात मुख्य अभिनेता तर आहेच, पण या चित्रपटातून तो निर्माता म्हणूनही पदार्पण करणार आहे. म्हणूनच या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कार्तिक खूप मेहनत घेताना दिसत आहे.
View this post on Instagram
कार्तिक आर्यन स्टारर हा मोस्ट अवेटेड चित्रपट 17 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर कार्तिक आणि क्रिती सेनॉन व्यतिरिक्त या चित्रपटात मनीषा कोईराला, परेश रावल, रोनित रॉय आणि सचिन खेडेकर दिसणार आहेत. रोहित धवन दिग्दर्शित या चित्रपटाला प्रीतमने संगीत दिले आहे.