श्रीनगर – कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी काल जम्मू आणि काश्मीरात भारत जोडो यात्रेचा समारोप केल्यानंतर आज मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील खीर भवानी आणि हजरतबल या दोन श्रद्धास्थानांना भेट दिली.
देश में एकता रहे भाईचारा रहे।
कश्मीर की प्रसिद्ध हज़रतबल दरगाह में राहुल गांधी ने मांगी देश में अमन और शांति की दुआ।#BharatJodoYatra pic.twitter.com/zkNFOouIDK
— Bharat Jodo (@bharatjodo) January 31, 2023
काश्मिरी पंडितांसाठी हे मंदिर एक आदरणीय देवस्थान आहे. खीर भवानी हे काश्मीरी पंडितांचे आदराचे श्रद्धास्थान आहे. त्यानंतर त्यांनी येथील प्रसिद्ध दल सरोवराच्या काठावरील हजरतबालला दर्ग्यालाही भेट दिली.
.@RahulGandhi और @priyankagandhi जी ने कश्मीर घाटी में विराजमान माता खीर भवानी दुर्गा मंदिर में माता टेक कर मां का आशीर्वाद लिया और देश की एकता व समृद्धि की मंगलकामना की।#BharatJodoYatra pic.twitter.com/H08QekEGDa
— Bharat Jodo (@bharatjodo) January 31, 2023
या दर्ग्यात पैगंबर मोहम्मद यांचे अवशेष आहेत आणि खोऱ्यातील मुस्लिमांमध्ये ते अत्यंत आदरणीय आहे. विविध धर्मियांचेही ते आदराचे स्थान आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या भेटी गुप्त ठेवण्यात आल्या होत्या, असे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे.