नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं आज पहाटे निधन झाले आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
PM Modi has left for Ahmedabad, flagging off of Vande Bharat train in Howrah, Kolkata & other developmental works of railways and under Namami Gange & meeting of National Ganga Council to be held as per plan. PM Modi may join through Video Conference: Sources
— ANI (@ANI) December 30, 2022
पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचं पार्थिव घरी आणण्यात आले आहे. गांधीनगरमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचे पुत्र पंकज मोदी यांच्या रायसणमधील घरापासून सकाळी आठ वाजता अंत्ययात्रा सुरु होईल. तर सेक्टर 30 मधील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
हिराबेन यांचे पार्थिव घरी आणण्यात आले आहे. गांधीनगरमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचे पुत्र पंकज मोदी यांच्या रायसणमधील घरापासून सकाळी आठ वाजता अंत्ययात्रा सुरु होईल. तर सेक्टर 30 मधील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.