Entertainment : अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख यांचा काही दिवसांपूर्वीच लग्नसोहळा पार पडला. या लग्नाला अनेक मराठी कलाकार मंडळी उपस्थित राहिले होते. प्रसाद-अमृताच्या लग्नसोहळ्याचे फोटो, व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले होते. ‘बिग बॉस मराठी’च्या शोनंतर ही जोडी चांगलीच चर्चेत आली. ‘बिग बॉस मराठी 4 च्या पर्वामध्ये घरात प्रसाद आणि अमृताची केमिस्ट्री अनेकांच्या पसंतीस पडली होती. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतरही त्यांनी आपले नाते चांगले ठेवले आणि अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
ही जोडी लग्नबंधनात अडकल्यानंतर त्यांच्यावर चाहत्यांसह कलाकार मंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला. विशेष लग्न झाल्यानंतर काही दिवसांच प्रसादने पुन्हा एकदा मोठ्या उत्साहाने कामाला सुरुवात केली आहे. प्रसाद लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेतून प्रसादची एंट्री होणार आहे. या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये प्रसादला पाहायला मिळत आहे. ‘समर’ असे त्याच्या भूमिकेचे नाव आहे. मालिकेच्या या नव्या प्रोमोवर अनेक प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मालिकेतली प्रसादची एन्ट्री पाहून प्रेक्षकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
लग्नापूर्वी प्रसाद ‘कलर्स मराठी’च्या ‘काव्यांजली’ या मालिकेत पाहायला मिळाला होता. या मालिकेत त्याने प्रितम ही भूमिका साकारली होती. पण लग्नामुळे प्रसाद ‘काव्यांजली’मधून एक्झिट झाला आणि त्याची जागा आदिश वैद्यने घेतली. यापूर्वी प्रसादने असे हे कन्यादान, अरुंधती, कुलस्वामिनी अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय तो चित्रपटांमध्ये झळकला आहे.