Praniti Shinde on Ram Satpute । Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजपकडून त्यांची पाचवी यादी जाहीर केलीय. या यादीत १११ जणांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे या यादीत महाराष्ट्रातली तीन जागांवर नावाची घोषणा केली. ४८ जागांपैकी महाराष्ट्रात भाजपाने २३ जागांवर दावा केलाय. यात सोलापूर मतदारसंघातून राम सातपुतेंना उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपाचे राम सातपुते यांच्यात लढत होणार आहे.
अश्यातच आता प्रणिती शिंदे यांनी राम सातपुतेंना आव्हान दिलं आहे. यावेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, “तुम्ही माझ्या वडिलांच्या संघर्षाचे सांगता. मात्र बाहेरच्यांनी येऊन आम्हाला पावती द्यायची गरज नाही. तुम्ही कोण लागून गेलात माझ्या वडिलांचा अपमान करायला? मी उमेदवार आहे. माझ्यावर बोला, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. । Praniti Shinde on Ram Satpute
राम सातपुते हे आपल्या खोट्या गरीबीचा दाखला देत म्हणत फिरतात ‘अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काबिल है वहीं राजा बनेगा’ मग सोलापुरात केलेल्या लोक हिताच्या कामांबद्दल बोला आणि लोकांना ठरवू द्या कोण काबिल आहे ते…, असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
कोण आहेत राम सातपुते ? । Praniti Shinde on Ram Satpute
राम सातपुते हे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माळशिरसचे विद्यमान आमदार आहेत. राम सातपुते यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकीय क्षेत्रात पाऊल टाकलं. 36 वर्षीय राम सातपुते हे मूळचे बीड जिल्ह्यातील डोईठाण (ता. आष्टी) येथील आहेत.
वडील ऊसतोड कामगार होते. त्यामुळे त्यांचे कुटुंब माळशिरससारख्या ऊस पट्ट्यात आले आणि इथेच स्थायिक झाले. राम सातपुते पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सहभागी झाले. तेव्हापासून त्यांनी सक्रियपणे विद्यार्थी संघटनेचे काम केले. । Praniti Shinde on Ram Satpute
2015 च्या दरम्यान जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कन्हैया कुमार आणि इतर विद्यार्थी नेत्यांना अटक झाली. त्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांचे समर्थन केलं होतं. या पार्श्वभूमीवर राम सातपुते आणि इतर अभाविपच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात मोठे आंदोलन केलं. त्यानंतर सातपुते चर्चेत आले होते.
अ. भा. विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री आणि भारतीय जनता युवा मोर्च्याचे प्रदेश उपाध्यक्षपद सांभाळत असताना मागील 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना माळशिरस राखीव मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. या निवडणुकीत राम सातपुते यांनी राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांचा 2702 मतांनी पराभव करत विजय मिळवला. सातपुते हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात.