मुंबई – मागील महिन्याभरात औरंगजेबाचे स्टेट्स ठेवल्यावरून राज्यातील अनेक जिह्ल्यामध्ये दंगली झाल्या. अशात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहून त्याचं दर्शन घेतलं. या दरम्यानचे फोटो सोशल व्हायरल होत आहे. या फोटोत आंबेडकर यांना फेटा बांधून त्यांचं स्वागत करण्यात आलं.
थेट संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवानेच औरंगजेबाच्या समाधीच दर्शन घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. या फोटोवरून आता अनेक राजकीय नेते आपापल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहे. तसेच, सोशल मीडियावर शिवप्रेमींकडून निषेध व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, अश्यातच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही यावर आपले मात व्यक्त केलं आहे. यावेळी अजित पवार माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “प्रकाश आंबेडकर हे ज्येष्ठ नेते आहेत. ते बाबासाहेब आंबेडकरांच्या घरातले आहेत. तसेच ते माजी खासदार व वंचित आघाडीचे नेते आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने त्यांच्या सद्सद्विवेक बुद्धीला अनुसरून काय करावं?
हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. लोकशाहीत संविधानाने हा अधिकार दिला आहे. पण असं कुणी केलं तर ते शिवप्रेमींना आवडत नाही. शिवाजी महाराजांनी जेव्हा हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तेव्हा औरंगजेबाने महाराजांना त्रास दिला होता. इतिहासात ज्या काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे लोकांना ती कृती योग्य वाटत नाही’. असं अजित पवार म्हणाले.