मुंबई – ‘क्या होगा निम्मो का’, ‘कयामत’ आणि ‘इश्क का रंग सफेद’ यांसारख्या हिट टीव्ही मालिकांमध्ये दिसलेली संजीदा शेख हे आज टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. संजीदाची गणना टीव्हीच्या बोल्ड अभिनेत्रींमध्ये केली जाते. संजीदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगलीच सक्रिय असते. संजीदाचे सोशल मीडिया अकाउंट तिच्या बोल्ड फोटोंनी भरलेले आहे. अशात तिने टाकलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
संजीदाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती एका स्विमिंगपूलमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी अभिनेत्रीचा बिकिनीमधील लूक चांगलाच लक्षवेधी ठरतोय. संजीदाच्या बोल्डनेसमुळे हा फोटो चांगलाच चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे यावेळी तिच्यासोबत तिची मुलगी देखील आहे. दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
संजीदाचा लूक अनेकांना आवडला असला तरी तिने मुलीसोबतचा असा फोटो शेअर केल्याने अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. यावेळी नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला कमेंटमध्ये नको ते सल्ले द्यायला सुरुवात केली आहे. मुलीसोबत असे फोटो शेअर करताना तुम्हाला लाज वाटत नाही का ? असा सवाल एका युजरने केला आहे. तर आणखी एकाने असं वागू नका मुलांवर वाईट परिणाम होतो असं कमेंटमध्ये म्हंटल आहे.