मुंबई – हॅनीट्रॅपद्वारे पाकिस्तानी गुप्तचरांच्या हस्तकांना गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक (डीआरडीओ) डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्याविरोधात तब्बल दोन हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. राफेल विमानासहित अन्य महत्वाची माहिती कुरुलकर यांनी पाकिस्तानी एजंट झाराला सांगितल्याचे समजते. कुरुलकर यांचे व्हाट्सअप आणि इंस्टाग्रामवरील चॅट समोर आल्यानंतर याबाबतची माहिती उघड झाली आहे.
केवळ शरीर सुखासाठी कुरुलकर यांनी क्षेपणास्त्राबाबतची गुपित फोडल असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. कुरुलकर यांच्या चॅटमधून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुरुलकर यांनी राफेल विमानांपासून क्षेपणस्त्रांवरही चर्चा केल्याची माहिती एटीएसच्या हाती लागली आहे. आरोपपत्रानुसार कुरुलकर आणि झारा यांच्यामध्ये अनेकदा चॅट होत असल्याचे देखील समोर आले आहे.
डॉ. कुरुलकर यानं ब्रह्मोस मिसाइल, अग्नी-६ मिसाइल, आकाश मिसाइल, अस्त्र क्षेपणास्त्र, ड्रोन प्रोजेक्ट आदींबाबत झाराला माहिती दिली आहे. एटीएसने हे सर्व चॅट्स डॉ. कुरुलकर याच्याविरोधात विशेष न्यायालयात दाखल दोषारोप पत्रासोबत जोडले आहे.