मुंबई – “बाहुबली” या दाक्षिणात्य चित्रपटातून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेता प्रभास याचा आणखी एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “राधेश्याम” असं या चित्रपटाचं नाव असून यामध्ये प्रभाससोबत अभिनेत्री पूजा हेगडे हिने मुख्य भूमिका साकारली आहे .
हा चित्रपट राधाकृष्ण कुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. राधेश्याम हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित असून त्यामधील नायक नायिकेचे नशीब कसं त्यांना एकत्र आणतं हे दाखवण्यात येणार आहे .
अभिनेता प्रभासने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट राधेश्याम चित्रपटाची नवी रिलीज डेट जाहीर केली आहे. त्याने नव्या डेटसह राधेश्यामचे पोस्टर शेअर केले आहे. त्यामध्ये त्याचा हा चित्रपट 11 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे त्याने सांगितले आहे. 11.03.22. I’ll see you. असे त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
प्रभास आणि पूजा व्यतिरिक्त या चित्रपटात सचिन खेडेकर, भाग्यश्री, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.